ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदा वडगाव (गां.) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

जेवळी (ता.लोहारा ) / सुधीर कोरे

ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदा वडगाव (गांजा, ता. लोहारा) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडत आहे.

वडगाव (गांजा, ता लोहारा) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचासाठी एकमेव अर्ज व नऊ सदस्यांसाठी नऊच उमेदवारी अर्ज राहिल्याने येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदा येथील निवडणूक बिनविरोध पार पडत आहे.

वडगाव (गां, ता लोहारा) हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील मतदार संख्या ही २ हजार १६१ इतकी असून येथील ग्रामपंचायत सदस्य संख्याही नऊ आहे. गावची परिसरात अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख आहे. आतापर्यंत येथील प्रत्येक निवडणुका या चुरशीच्या पार पडल्या आहेत. परंतु यावेळी येथील रहिवासी असलेले तथा उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, विठ्ठल- साई साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गुंडाप्पा भुजबळ, माजी सरपंच बबन फुलसुंदर, कनिष्ठ अभियंता राजेंद्र माळी, प्रा. डॉ. एस पी गायकवाड, विका सेवा सोसायटीचे अध्यक्ष बिबीशन पवार आदींनी निवडणूकीतून होणारा खर्च व वाद टाळत गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी गावातील सर्व समाजातील व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेत ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. येथील सरपंच पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे यासाठी अनुराधा भागवत धनाने यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. परंतु नऊ सदस्यांसाठी बारा अर्ज दाखल झाले होते. येथील नागरिकांनी निवडणूक बिनविरोधासाठी शेवटपर्यंत प्रयत्न लावून धरल्याने उमेदवारी परत घेण्याच्या दिवशी बुधवारी (ता ७) तीन उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. आता फक्त जाहीर होण्याचे औपचारिकता राहिली आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदा येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे तसेच तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यात वडगावची एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होत आहे.

 बिनविरोध निवड होणाऱ्या सरपंच व सदस्यांची नाव- सरपंच अनुराधा धनाने, सदस्य- सतीश पाटील, बबन फुलसुंदर, हिना सय्यद, द्रोपदी पवार, धनश्री गायकवाड, पार्वती साळुंखे, कोमल पवार, सावित्री फुलसुंदर ज्ञानेश्वर भुजबळ असे आहेत

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!