आरणी पाटीजवळ चारचाकीची दुचाकीला धडक दुचाकीस्वार जागीच ठार

लोहारा : मोटार सायकलमध्ये पेट्रोल भरुन गावाकडे येत असताना आरणी पाटी जवळ रस्ता क्रॉस करताना चारचाकी गाडीची दुचाकीला जोराची धडक लागल्याने भातागळी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावने दोनच्या सुमारास घडली आहे.
सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, लोहारा तालुक्यातील भातागळी येथील नितिन मधुकर जगताप (वय ४३) हा मंगळवारी दुपारी कानेगावाहुन पाटोदा पाटी जवळी पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यास गेला होता.
पेट्रोलभरुन परत येत असताना दुपारी पावने दोनच्या सुमारास आरणी पाटीजवळ रस्ता क्रॉस करत असताना लातुरहुन तुळजापुरकडे जाणारी चारचाकी गाडीची जोराची धडक दुचाकीला बसली यात दुचाकी स्वार नितिन जगताप जागीच ठार झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,दोन मुले, एक मुलगी असा परीवार आहे.