लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल चा 100 % निकाल
लोहारा ( जि.धाराशिव ) :
मार्च 2024 मधे झालेल्या 10 वी SSC परीक्षेत वसंत दादा पाटील हायस्कूल लोहारा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे .
कु. रसाळ अश्विनी हणमंत या विद्यार्थीनीने 93 % गुण घेऊन सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .
प्रथम – कु. रसाळ अश्विनी हणमंत 93 %
द्वितीय – कु. शिवकर अस्मिता अमोल 92.40 %
तृतीय – कु.भोकरे सपना नेताजी हिने 92 % गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला .
एकुण 61 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती . यापैकी 29 विद्यार्थी विशेष प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले . 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 10 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यां चे संस्थेचे सचिव तथा शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील , वसंत दादा पाटील हायस्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिलाताई जावळे पाटील व सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.