आष्टामोड ते लोहारा रस्त्यावर झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी

जेवळी (लोहारा) : आष्टामोड लोहारा या राज्य महामार्गावरील दक्षिण जेवळी गावापासून एक किमी अंतरावर दोन मोटारसायकलचे समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
राज्य महामार्ग क्रमांक 211 वरील आष्टामोड ते लोहारा या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पंधरा दिवसापासून रस्ता डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी पडली असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहने स्लीप होत असल्याने अपघात होत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दक्षिण जेवळी गावापासून एक किमी अंतरावर दोन दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात बबन सुभाष बिराजदार पाटील जळकोट ता तुळजापूर व लिंबाजी जाधव, विनोद पाटील रा व्हणाळी हे अपघातात जखमी झाले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

अपघाताची माहिती मिळताच शिव बसव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव कारभारी, सन्नी भुसाप्पा, कल्याणी ढोबळे, प्रथमेश पाटील,मंगेश बंडे यांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी उमरगा येथे पाठवण्यात आले.

🔴 एक महिन्यात चार अपघात सात गंभीर तर तीन किरकोळ जखमी

या महिन्यातील आष्टामोड ते जेवळी या मार्गावरील आजचा हा चौथा अपघात आहे. पहिला अपघात दोन नोव्हेंबर रोजी झाला यात एक गंभीर जखमी झाला. दुसरा अपघात 19 नोव्हेंबर रोजी झाला त्यात दोन गंभीर जखमी झाले. तिसरा अपघात 22 नोव्हेंबर रोजी झाला त्यात पाच जखमी झाली त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले. चौथा अपघात 28 नोव्हेंबर रोजी झाला त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या चार अपघातात सात जण गंभीर जखमी तर तीघे किरकोळ जखमी झाले आहेत.


🔴 वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी
आष्टामोड जेवळी या रस्त्यावर डागडुजी ची कामे सुरू असूनही वाहने सावकाश चालवणे आवश्यक आहे. दक्षिण जेवळी व रूद्रवाडी येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तर जेवळी येथे शाळेसाठी जात असतात त्यांना यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या चालकांचा पोलिसांनी लक्ष देवून बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

🔴 शिव बसव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कारभारी यांची मदत
चार अपघातापैकी तीन अपघातातील जखमींना दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्याचे काम शिव बसव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव कारभारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.त्यामुळे महादेव कारभारी यांचे सोशल.मिडीयातून अनेकांनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!