सोशल मिडीया माध्यमातून वनमंत्री मुनगंटीवार यांची थेट मदत ; नो गॅरंटी बाळाला मिळाले जीवनदान

बसवराज होणाजे
जेवळी ( जि.उस्मानाबाद ) :
अन्न नलिका आणि गुदाशय नसलेल्या दोन दिवसाचे बाळ जन्म झाल्यावर जीवन आणि मृत्यूशी झुंज देत जगण्यासाठी धडपडत होते. या कठीण प्रसंगात डाँक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी म्हणाल्याने हताश आणि निराश मनानी कुटुंबातील सर्वानीच बाळाच्या जगण्याच्या अपेक्षा सोडून पाच दिवस त्याच्याकडे फक्त पाहत राहिले. अशा या निर्णयकक्षणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देवासारखे यांच्या मदतीने धावले आणि उपचाराला बळ मिळत बाळाला जीवनदान मिळाले. यामुळे विदर्भाची थेट मराठवाड्याला मदतीची मेहरबानी झाली आहे.
उमरगा उपजिल्हा रुग्णालयात 27 आँक्टोबर रोजी ज्योती सतीश जेऊरे हिचे प्रसूती झाले यावेळी तीला मुलगी झाली होती. अगोदरची पण एक मुलगी होती. या प्रसूती दरम्यान सिजर झाले होते बाळ गुटगुटीत व ठणठणीत असल्याचे डाँक्टरांनी सांगितल्याने त्यांनी त्वरित दोन मुलीवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. परंतु चार पाच तासानंतर बाळाने शीच न केल्याने बघितले असता गुदाशय नसल्याचे निदर्शनास आले यावेळी येथील डाँक्टर आणि कर्मचाऱ्यांना या कुटुंबाने धारेवर धरले होते.
शेवटी एक दिवसाच्या बाळाला मुलीची मावशी प्रियंका संतोष करपे यांनी उमरगा आणि लातूर येथील खाजगी आणि शासकीय रूग्णालयात बाळावरती उपचार व्हावे म्हणून मोठा प्रयत्न केला. एका खाजगी डॉक्टरांनी संपूर्ण बाळाला चेक केले असता बाळाला अन्ननलिका नसल्याचे निदर्शनास आले. उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले तरी नो गँरंटी असे सांगितल्याने निराश झालेले संपूर्ण कुटुंब गुंजोटी येथे असवस्थ होवून बसले.
या वेळी झालेला सर्व प्रकार प्रियंका करपे यांनी स्थानिक आमदार, खासदार माजी खासदार यांना व अनेकांना भेटून आणि फोन करून सांगितले मात्र याचा फारसा उपयोग झाला नाही. हीच बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्यंत पोहचली. तेंव्हा तात्काळ त्यांनी संकटात सापडलेल्या यांना पहिल्यांदा विश्वास दाखवत उपचारासाठी तयार केले या परिसरातील त्यांच्या कार्यकर्ते मार्फत मदतीची यंत्रणा पाठवली. प्राथमिक तपासणी करण्यासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाला पाणी पाजविल्याने फुफ्फुसात मोठ्या प्रमाणावर ईन्फेक्शन झाले होते त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता.
सोलापूर येथील डॉ रीतवीक जायकर, डॉ रवि खंडलगावकर, डॉ सचिन बंदीछोडे यांनी हार न मानता पूर्णपणे प्रयत्न सुरू केले दरम्यान अक्लकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी रूग्णालयात येवून सर्व मदत आणि सहकार्य केले.वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांचे सहकारी नेहमी दूरध्वनी वरुन संपर्कात होते यामुळे नातेवाईकाचा विश्वास वाढला बाळही हळूहळू पणे उपचारासाठी प्रतिसाद दिला अखेर डाँक्टरांच्या प्रयत्नाला यश आले बाळावरती यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अन्ननलिका नसलेले बाळ जन्माल्यानंतर पंचवीस दिवसांनी दूध पिले आणि बाळाला एक प्रकारे जीवनदान मिळाले. यासाठी येथील डॉ पूजा देशमुख, डॉ स्नेहल, डॉ विजय, डॉ विशाखा, डॉ राघव सोलापूर यांनी खूप सहकार्य केले. तब्बल एक महिना झाले बाळ अगदी ठणठणीत आहे. बाळाला पाहिले की होय मी जगणारचं असे म्हणतोय का असे वाटते.
🔴 स्थानिक नेत्यांचं काय
या संदर्भात येथील सर्वच स्थानिक नेते यांच्या कडे मदतीसाठी जावूनही कोणाची मदत झाली नाही. गरीबांच्या प्रश्नाकडे कोण बघणार. आज विदर्भाची मदत झाली मग स्थानिक पातळीवर नेते कशासाठी या प्रश्न उपस्थित होत आहे.
🔴 या कुटुंबातील सदस्यांनी उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार देवून हलगर्जीपणा करणारे कर्मचारी आणि गोरगरीब जनतेकडून लँब तपासणी करण्यासाठी पैसे घेतले जात आहे यामुळे गरीबांची हेळसांड होत आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात असा प्रसंग कोणत्याही रुग्णाच्या बाबतीत घडू नये एवढीच कुटुंबाची माफक अपेक्षा आहे.
🔴 विदर्भाची थेट मराठवाड्याला मदत
कसल्याही प्रकारचे संपर्क नाही, ओळख नाही, सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कुटुंबाला केवळ सोशल मिडीयामुळे राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवलेला विश्वास आणि केलेली मदत यामुळेच आज बाळ जिवंत आहे यासाठी सोलापूर मधील आमदार सचिन कल्याणशेट्टी यानीही वेळोवेळी केलेली मदत आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
प्रियंका करपे, उमरगा