डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून आ. चौगुले यांची निवड

लोहारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले यांची नामनुियक्ती करण्यात आली आहे.
मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून श्री ज्ञानराज चौगुले, वि.स.स. यांना नामनिर्देशित केले आहे. त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे.