अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 17 छापे

उस्मानाबाद : मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल मंगळवार दि. 22.11.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 17 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 248 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 94 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या एकुण 352 बाटल्या असे मद्य जप्त करुन एका गुन्ह्यातील मद्य वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 54,139 ₹ आहे. यावरुन 17 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 17 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने पाच ठिकाणी छापे टाकले. यात पारधी पिढी, गावसुद येथील- राजेंद्र पवार, संगीता कांबळे व छायाबाई पवार हे तीघे 12.30 ते 14.40 वा. सु. पारधी पिढी शिवारात वेगवेगळ्या तीन ठिकाणी प्रत्येकी 10 लि. गावठी दारु अशी एकुण 30 लि. गावठी दारु बाळगलेले, तर कायापुर येथील- बालाजी कांबळे हे 14.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर देशी- विदेशी दारुच्या 83 सिलबंद बाटल्या व 04 लि. गावठी दारु बाळगलेले, तसेच देवळाली ग्रामस्थ- सुमन चांदणे या 15.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या व 05 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
2) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात कडकनाथवाडी येथील- अमाकांत सोनवणे हे 19.00 वा. सु. गावातील साठेनगर येथे 20 लि. गावठी दारु बाळगलेले, तर शेलगाव येथील- बुध्दभुषण खुने हे 20.00 वा. सु. गावातील आपल्या घरात देशी- विदेशी दारुच्या 106 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
3) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेंबळी पो.ठा. हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकले. यात पाडोळी ग्रामस्थ- प्रमोद वाघमारे हे 12.30 वा. सु. पाडोळी शिवारातील हॉटेल प्रियलजवळ देशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर कनगरा ग्रामस्थ- पद्माकर सुरवसे हे 13.30 वा. सु. पाडोळी शिवारातील हॉटेल रविराजबाजूस देशी दारुच्या 43 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
4) अंबी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात अनाळा ग्रामस्थ- राजमल शिंदे हे 16.30 वा. सु. गावातील इनगोंदा रस्त्यालगत एका घराच्या आडोशाला देशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर चिचपुर (खु.) येथील- मधुकर गजरमल हे 17.50 वा. सु. गावातील एका दुकानाच्या आडोशाला देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
5) परंडा पो.ठा. च्या पथकाने कांदलगाव येथे 11.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- दिलीप चव्हाण हे कांदलगाव शिवारातील मधु चोबे यांच्या शेतात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला 98 लि. द्रव पदार्थ बाळगलेले असताना पथकास आढळले.
6) उमरगा पो.ठा. च्या पथकाने कोरेगाववाडी येथे 15.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- तानाजी बाचके हे गावातील जि. प. शाळेजवळील रस्त्याने एका मोटारसायकलवरुन देशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैधरित्या वाहून नेत असताना आढळले.
7) कळंब पो.ठा. च्या पथकाने गंभीरवाडी येथे 17.10 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- नानीबाई शिंदे या गावातील आपल्या राहत्या घरामागे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 150 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या आतसना आढळल्या.
8) लोहारा पो.ठा. च्या पथकाने बेलवाडी येथे 19.15 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- अनिल शिंदे हे गावातील ग्रामपंचायत कार्यालयातजवळ विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
9) ढोकी पो.ठा. च्या पथकाने लमाण तांडा, आरणी येथे 17.00 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- कमलाबाई राठोड या तांडा परिसरात 35 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
10) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने बोरगाव (राजे) शिवारात 15.45 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- चंद्रकांत लोंढे हे गावातील राजुरी रस्त्यालगत असलेल्या हॉटेल प्रथमेशजवळ देशी दारुच्या 20 सलिबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!