सास्तुर चौरस्ता येथे एसटी बसची दुचाकीला धडक ; दुचाकीवरील दोघे जखमी

लोहारा : एसटी बसची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील एक जण गंभीर जख्मी झाला असून त्याला उमरगा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील चौरस्ता जवळील सास्तूर-लोहारा मार्गावर गुरूवारी ८ डिसेंबर रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास घडला आहे.
उमरगा-बोरेवली एसटी बस सास्तूर मार्गे लोहाऱ्याकडे निघाली होती. यावेळी गोपाळ इगवे, आकाश चिमुकले ( रा. सास्तूर) हे दोघे माकणी येथील सिध्देश्वर यात्रा करून आपल्या दुचाकीवरून सास्तूरकडे निघाले होते. यावेळी सास्तूर चौरस्ता जवळील वळण रस्त्यावर बसची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात गोपाळ इगवे गंभीर जख्मी झाले. तर आकाश चिमुकले किरकोळ जख्मी झाले. गंभीर जखमी इगवे यांना उमरगा येथील रूग्णालयात हलविण्यात आले. तर आकाश चिमुकले यांना सास्तूर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सास्तूर औटपोस्ट पोलिस ठाण्याचे पोहेकॉ व्ही. एस. धवन, आर. एल. सांगवे घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!