सेवानिवृत्त कोतवाल हुसेनसाब शेख यांचे निधन

लोहारा : लोहारा तालक्यातील उंडरगाव येथील सेवानिवृत्त कोतवाल हुसेनसाब शेख (वय ६५) यांचे सोमवारी दुपारी साडे तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उंडरगाव येथे रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात पत्नी,तीन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. कास्ती खुर्द जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक रसुल शेख यांचे ते वडील होत.