लोहारा ( जि.धाराशिव ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश बिराजदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र धुरगुडे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री सचीन रणखांब यांची निवड करून नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश बिराजदार यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी श्री शमशोद्दीन जमादार , श्री अमोल पाटील,श्री नागेश निंबाळकर, इम्तियाज शेख यांची उपस्थिती होती.