श्री.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजू कुटूंबाना बॅलकेंटचे वाटप

लातुर : लातुर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथील विकास नगर येथे श्री. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस मा. देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके यांनी पुष्पहार घालून तर प्रकाश महाराज यांनी विधीयुक्त पुजा केली. श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत बॅलकेंट प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. यावेळी हरीनंद सगर, रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो चे अध्यक्ष नागनाथ आगवाने, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक श्री. देवेंद्रजी आयलाने यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्र व त्यांचे कार्य यांच्या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामचंद्र शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिनंद सगर, देवेंद्रजी आयलाने, नागनाथ आगवाने, दयाराम सुडे, प्रकाश महाराज, व्यासपिठावर उपस्थित होते. या जयंती कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन श्री. प्रभूजी राठोड यांनी व त्यांच्या सहका-यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले.
श्री. प्रभू राठोड यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले. यावेळी विकास नगर येथील मा ग्रामपंचायत सदस्य ज्योती राठोड तसेच पदमीन गाडे, कलूबाई आडे, कालिंदा चव्हाण, संजय राठोड, नवनाथ क्षिरसागर, विकास आडे, नरेश मुळे, नसीमा शेख, सुरेखा राठोड, कवीता कांबळे, शाहु राठोड, युवराज पवार, महादेव राठोड, भरत सुर्यवंशी, पृथ्वीराजर राठोड, धरमविर राठोड, किरन राठोड व मोठ्या संख्येने महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.