राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याचे यश

लोहारा : मुंबई येथील रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धा दिनांक 15 जुलै 2022 रोजी घेण्यात आल्या होत्या. या रंगोत्सव स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
या स्पर्धेमध्ये स्कूलमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे एकूण 80 विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून कु. संस्कृती शहाजी जाधव हिस सन्मानचिन्ह, यासह शिवाजी शहाजी जाधव, श्रावणी प्रमोद कदम, प्रगती दगडू पांढरे, हर्षेवर्धन जयराज भुजबळ, ब्रिजेश सुरेश सोमवंशी, मनस्वी देवराव देवकर, अभिनव रामचंद्र गायकवाड, अभिषेक मुकेश माने, दिव्या दत्तात्रय बिराजदार, अस्मिता यशवंत चंदनशिवे, संजना सिद्धेश्वर जावळे, या 12 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आणि नंदिनी राघव पाल, श्रावणी सोमनाथ घोडके, समर्थ ज्योतिबा सुतार, अंकिता राघव पाल, हिरालाल लालधारी साव या 5 विद्यार्थ्यांना रजतपदक आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पर्यावरण संस्थेचे देवगिरी प्रांत संयोजक दत्ताजी पत्की, आर्य चाणक्य विद्यालय उस्मानाबादचे मुख्याध्यापक मनिष देशपांडे , निसर्गमित्र श्रीनिवास माळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यासाठी चित्रकला शिक्षक व्यंकटेश पोतदार, सविता जाधव, सिद्धेश्वर सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना यासाठी मार्गदर्शन केलेले होते. यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास भोसले, उपाध्यक्ष बालाजी जाधव, संचालक सुनीता गायकवाड, माधुरी चोबे, मुख्याध्यापक शहाजी जाधव यांच्यासह स्कूलमधील सर्व शिक्षक कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.