विविध धार्मिक कार्यक्रमांनी खंडोबा यात्रेस सुरुवात

किल्लारी : प्रशांत नेटके

तपसे चिंचोली येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा चंपाषष्ठी महोत्सवास घटस्थापना ,श्रींचा अभिषेक व खंडोबावारीने बुधवारपासून सुरुवात झाली आहे.चंपाषष्ठी यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

◆ तपसे चिंचोली येथील ग्रामस्थांचे दैवत असलेले खंडोबाच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक येतात. दरवर्षी ही यात्रा भरते.चंपाषष्ठी महोत्सव म्हणून पंचक्रोशीतून भाविकांची यावेळी गर्दी असते.

HTML img Tag Simply Easy Learning

यात्रा महोत्सवात बुधवार ( 23) रोजी तपसे चिंचोली येथील सांप्रदायिक भजनी ,गावकरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवारी ( 24) रात्री चंद्रकांत बडगे (ताडमुगळी ) यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम होत असून , शुक्रवारी (25 ) रोजी तपसेचिंचोली भजनी मंडळाचा कार्यक्रम , शनिवारी (26) पवन गुंडेराव बडगे (ताडमुगळी) यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम , रविवारी (27) खंडू वाघे राजुरी उस्मानाबाद यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम ,सोमवार (28) सकाळी सतसंग व रात्री दत्तू वाघे हाडोळी यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम होत असून मंगळवार 29 ला पहाटे पाच वाजता अभ्यंगस्नान ,अभिषेक महावस्त्र अलंकार पूजा , महाप्रसाद ,सकाळी बोरामनी , अनसरवाडा भारुडकर यांचा भारुडाचा कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!