आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणास संतोष सोमवंशी यांचा जाहीर पाठिंबा

उस्मानाबाद : आज शुक्रवारी दि. २८ रोजी उस्मानाबाद येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील हे सलग पाच दिवस शेतकऱ्यांच्या पिकविमा, अनुदान, ओला दुष्काळ विविध मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. तरी त्यांच्या आमरण उपोषणात सहभाग शिवसेना माजी जिल्हाप्रमुख लातूर तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, किशोर भोसले, विलास लंगर, संतोष सूर्यवंशी, आदी लातूर, औसा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख मान्यवरांनी नोंदविला.