जेवळी येथे युवक काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्र व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning
जेवळी ( ता.लोहारा ) : 

युवक काँग्रेस जेवळी शाखा, रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद संचलित जे. एस. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय (चॅरिटेबल) आणि स्वर्गीय प्रदीप मोतीचंद गांधी मेमोरियल डेंटल युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने जेवळी येथे मोफत नेत्र व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रुग्णाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

जेवळी येथील महिला बहुउद्देशीय सभागृहात गुरुवारी (ता.१६) युवक काँग्रेस जेवळी शाखा, रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद संचलित जे. एस. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय (चॅरिटेबल) आणि स्वर्गीय प्रदीप मोतीचंद गांधी मेमोरियल डेंटल युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एक दिवशीय शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक (मुंबई) राहुल कारभारी यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सरपंच महानंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, निवृत्त कार्यकारी उपअभियंता विरुपाक्ष स्वामी, सरपंच वैभव पाटील (नदगाव) तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष श्रीशैल भैरप्पा, युवक काँग्रेस शहराध्यक्ष रोहित कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या एकदिवसीय शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून यावेळी डॉ. शिवानी मेनकुदळे, डॉ. एस. बी. शिंदे व शिवरुद्र इसाके त्यांनी रुग्णाची तपासणी केली. यात ९६ रुग्णांनी नेत्र, १२ रुग्णांनी मोतीबिंदू व ३० रुग्णांनी दंत तपासणी करून घेतली आहे.

ही शिबिर यशस्वी होण्यासाठी युवक काँग्रेस जेवळी शहराध्यक्ष रोहित कारभारी, बंदेनवाज शेख, अभिजीत वर्दे, श्रीकांत वेलदोडे आदींनी परिश्रम घेतले आहे.

 

 

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!