कर्जप्रकरण मंजूर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर दिव्यांगाचे दुसऱ्याही बेमुदत उपोषण सुरु

लोहारा (जि.धाराशिव ) : वेळोवेळी पाठपुराव करूनही कर्जप्रकरण मंजूर करत नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तीने शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शुक्रवारपासून (ता. १७) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील बेंडकाळ येथील हणुमंत दयानंद कुभार या दिव्यांग तरूणाने जिल्हा उद्योग केंद्रा अंतर्गत सेमीमधून चक्की आट्टा उद्योगासाठी कर्जप्रकरण करून लोहारा शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे प्रस्ताव सादर केला होता. बँकेने लातूर येथील विभागीय ग्रामीण बँकेकडे मंजुरीसाठी कर्जप्रकरण पाठवले. परंतु, चार महिन्याचा काळ लोटला असतानाही कर्जप्रकरण अद्याप मंजूर झाले नाही. त्यामुळे हणुमंत कुंभार यांनी लातूर विभागीय बँकेकडे याबाबत चौकशी केली. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी उडवाउवीचे उत्तरे देऊन हाकलून दिले. त्यामुळे कुंभार यांनी कर्जप्रकरण मंजूर करण्याच्या मागणीसाठी शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.