महाराष्ट्र

लोहारा तहसिल कार्यालयावर सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा…

लोहारा ( जि.धाराशिव ) : दिनांक 10 डिसेंबर मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

मागील 3 ते 4 महिन्यापासून बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूवर होत असलेला अन्याय, अत्याचार व तेथील हिंदूचे श्रद्धास्थान असलेले इस्कॉन मंदिराचे पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अटक करून तुरुंगात डांबले व मंदिर नष्ट करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशभरात हिंदूच्या वतीने सामूहिक निषेध मोर्चे काढण्यात आले.यावेळी लोहारा शहरात छ. शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड,आझाद चौक,जगदंबा देवी मंदिर, नागराळ रोड, ते लोहारा तहसील कार्यालय या मार्गाने लोहारा तालुक्यातील हिंदू समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

 याप्रसंगी लोहारा तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा.श्री कोळेकर यांना उपस्थित हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूचे धार्मिक स्थळांचे संरक्षण करून हिंदू धर्माचाऱ्यांची सुटका करावी तसेच तेथील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालावा, यासाठी जागतिक मानवाधिकार आयोगाने लक्ष घालून बांगलादेशातील हिंदूची मालमत्ता व जिविताचे संरक्षण करण्यास बांगलादेशातील सरकारला भाग पाडावे व भारत सरकारने बांगलादेशावर दबाव टाकून हिंदूच्या जीविताचे संरक्षण करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्वर माऊली कुंभार महाराज, बबनगिरी महाराज, जनकल्याण समितीचे श्री शंकर जाधव, तालुका कार्यवाह श्री मनोज तिगाडे, श्री शहाजी जाधव, श्री राजेंद्र पाटील, श्री शिवशंकर हत्तर्गे, श्री विक्रांत संगशेट्टी, श्री शुभम साठे, श्री दगडू तिगाडे श्री प्रमोद पोतदार, श्री ओम कोरे, प्रा. श्री यशवंत चंदनशिवे, श्री प्रदिप ढोबळे, श्री मल्लिनाथ फावडे, श्री मुरलीधर होनाळकर, श्री दत्ता पोतदार, श्री बालाजी चव्हाण, श्री कल्याण ढगे, श्री प्रशांत माळवदकर,श्री युवराज जाधव,श्री विद्यासागर कदम, श्री सुयश दंडगुले, श्री शुभम गोसावी, यांच्यासह या निषेध मोर्चामध्ये लोहारा तालुक्यातील हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!