धाराशिव

लोकमान्य टिळकांना अभिवादन; न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोहारा : येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि. १) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य जाधव यांनी मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. “स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” या घोषणेद्वारे त्यांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जाज्वल्य प्रेरणा निर्माण केली. मंडाले कारागृहात त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जनतेने त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी बहाल केली, असे त्यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अल्पशिक्षित असूनही आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य केले. ‘फकिरा’ ही कादंबरी आणि ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ही शाहिरी आजही लोकप्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास शिक्षक सुहास पवार, सविता जाधव, वैशाली गोरे, दिपिका देशमुख, फराना शेख, सुलक्षणा जाधव, सानिया कोरे, सुलोचना वकिल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महिला पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन मीरा माने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!