वारकरी साहित्य परिषदेचा ११ वा वर्धापन सोहळा संपन्न

लोहारा प्रतिनिधी ( यशवंत भुसारे) : उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर मंदिर मंगल कार्यालयात वारकरी साहित्य परिषदेचा ११ वा वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत व माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील , बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणूरे, नितीन काळे, अनिल खोचरे,आदी मान्यवराने संत तुकाराम महाराज व ज्ञानेशवर माऊली ग्रंथांचे पुजन करुन वारकरी साहित्य परिषदेच्या कार्येक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोहारा तालुक्यातील दैनिक जनमतचे तालुका प्रतिनिधी यशवंत भुसारे ( पत्रकार) .ह.भ.प रामकृष्ण महाराज तोरंबा ( किर्तनकर) परमार्थ भुरटे( गायक) हर्षद घुगे ( मृदंगाचर्य) यांना वारकरी साहित्य परिषदेच्या ११ वा वर्धापन दिनाचे औचित्य विठ्ठल साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .या वेळी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्रीहारी चौरे, जिल्हा उपाध्यक्ष मेजर दिलीप गरड,महिला अध्यक्ष सिंधुताई बडुरे,लोहारा तालुकाध्यक्ष ज्ञानेशवर माऊली कुंभार, सचिन दासीमे सचिव, सरस्वती यादव महिला उपाध्यक्ष तर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी लोहारा तालुक्यातील संत मिरा भजनी मंडळ सालेगाव,संत कान्होपात्रा भजनी मंडळ तावशीगड, महिला भजनी मंडळ दतनगर, हनुमान भजनी मंडळ सय्यद हिप्परगा आदी जिल्ह्यांतील ४१ भजनी मंडळांना मृदंग, वीणा व पाच जोड टाळ देऊन नामाचा जयघोष करण्यात आला.