जालना येथील घटनेचे पडसाद ; लोहारा शहर कडकडीत बंद

लोहारा / प्रतिनिधी

जालना जिल्ह्यात पोलिसांनी केलेला लाठीचार्ज याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाज यांच्या वतीने बंद चे आवाहन करण्यात आले होते.
आंतरवाली सारटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बसलेले अजय जरडे पाटील यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी राज्य शासनाने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला व महिला बालके यांच्यावर देखील लाठीचार्ज व गोळीबार केला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोहारा सकल मराठा समाजातर्फे बाळासाहेब पाटील श्रीकांत भरारे, अभिमन्यू खराडे, प्रशांत काळे, महेश गोरे, यांनी लोहारा बंद चे आवाहन केले होते.
या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन स्वयंप्रेरणेने लोकांनी आपले व्यवसाय बंद केले व पोलीस प्रशासन व राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी विविध शाळा महाविद्यालय देखील बंद होते.
बाळासाहेब पाटील, अभिमन्यू खराडे, प्रशांत काळे, श्रीकांत भरारे, दीपक रोडगे, मिटू ढगे, रंजनाताई हासुरे, सुखदेव सातपुते, महेश गोरे, प्रकाश भगत, स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात,  नितीन गोरे संघटनेचे तालुकाध्यक्ष जावळे, तानाजी पाटील, दत्तात्रय मुळे, हनुमंत गरड, संजय मुरटे, आकाश येरनुळे, बालाजी मुळे, महेश सुतार, परमेश्वर जाधव,सतीश जाधव.योगेश गरड.,बाळु कांबळे,मंगेश गोरे ,जिवन गोरे,आवीनाश गोरे,सागर पाटील, रोहन खराडे,अमोल जाधव, दत्ता घाडगे, आधीसह आदी समाजबांधव समाजबांधव उपस्थित होते,
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!