धाराशिवमहाराष्ट्र
लोहारा शहरातील गुरुवर्य कुमारसागर स्वामी महाराज यांना “राष्ट्रीय शिवकथाकार” पुरस्कार कपिलधार येथे शिवा संघटनेचा २०२५ चा सन्मान समारंभ संपन्न

लोहारा ( जि. धाराशिव ) : शिवा संघटनेतर्फे आयोजित “राष्ट्रीय शिवकथाकार पुरस्कार–२०२५” या प्रतिष्ठेच्या सन्मानाने लोहारा शहरातील गुरुवर्य कुमारसागर स्वामी महाराज लोहारेकर यांना गौरविण्यात आले.
हा पुरस्कार समारंभ कपिलधार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री बाबासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.




