अचलेर येथील खुल्या माफी गायरान जागेवर क्षत्रिय राजपूत वीरांगणा राणी पद्मावती यांच्या नावाने सामाजिक सभागृह उभारावे

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील खुल्या माफी गायरान जागेवर क्षत्रिय राजपूत समाजाला राष्ट्रमाता क्षत्रिय राजपूत वीरांगणा राणी पद्मावती यांच्या नावाने सामाजिक सभागृह उभे करण्याकरिता समाजाच्या वतीने बारा वर्षांपासून नियोजित केलेल्या कब्जाेवहिवाटीतील जगेचा मालकी हक्कात नोंद घेण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यपूर्व काळात क्षत्रिय राजपूत समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे अचलेर येथे बहुसंख्य प्रमाणात क्षत्रिय राजपूत समाज असून समाजाच्या सांस्कृतिक रूढी परंपरा जोपासण्याकरिता सामाजिक सभागृहाचे अत्यंत आवश्यकता भासत आहे. गावात इथं सर्व समाज बांधवांना सामाजिक रूढी परंपरा संस्कृती कार्याकरिता ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या अधिकार क्षेत्र गायरान उद्घाटन जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. परंतु आजतागायत वेळोवेळी मागणी करून ही क्षत्रिय राजपूत समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही.
क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने सलग बारा वर्षापासून समाजाने नियोजित केलेल्या कब्जे वहिवाटीतील अचलेर सलगरा रोडलगत खुल्या माफी गायरान क्षेत्रावरील १२० बाय ६० जागेचा ग्रामपंचायतीने मालकी हक्कात नोंद घ्यावी व या विषयी जिल्हाधिकारी यांनी योग्य ते आदेश तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाला द्यावी अशी मागणी क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे
या निवेदनावर डॉ. निवास राजपूत, शक्तीसिंग बायस, गोपालसिंग राजपूत आनंद सिंग बायस,प्रतापसिंग गहिलोत, पवनसिंग गहिलोत, अभयसिंग बायस, गणेश सिंह बायस शरणपा काटकटे, मारुती जामगे,प्रकाश कोळेकर, सातलिंग पाटील,संदीप कदम,अजित कासार, सतिश घंटे यांच्यासह गावातील इतर सर्वधर्मीय नागरिकांच्या १५० स्वाक्षऱ्या आहेत.

 अचलेर येथे सर्वे नंबर ११६३ मध्ये जवळपास ३०.३२ हेक्टर माफी गायरान सातबारावर आजही क्षेत्र आहे. परंतु प्रत्यक्षात जवळपास सर्वच क्षेत्र स्थानिक नागरिकाकडून अतिक्रमपीत झाल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसून येत आहे. याबाबतचे मालकी हक्कातील भोगवटादार प्रमाणपत्र ग्रामपंचायतने काहीना दिले आहे तर काहीजन आज हि अतिक्रमणित जागा आपल्या कब्जेवाटीत घेऊन मालकी हक्काच्या प्रतीक्षेत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!