जेवळी (ता.लोहारा ) :- तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथील बाळकृष्ण दासमे हे केंद्रीय राखीव सुरक्षा बलातून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढून सपत्निक सत्कार केला.
केंंद्रीय राखीव सुरक्षा बलातून सहाय्यक उपनिरिक्षक पदावरुन सेवानिवृत्त होऊन गावी आलेले सेनाधिकारी बाळकृष्ण रंगा दासमे हे 31 जुलै रोजी अठ्ठावीस वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झाले. तीन आँगस्ट रोजी ते सलगरा मड्डी ता.तुळजापूर येथे आल्यानंतर गावात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व फटाक्यांची आतिषबाजी करीत जोरदार स्वागत केले यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले त्यानंतर सजवलेल्या घोड्यावर बसवून त्याची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्याच्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली.
देशसेवा करुन परत आलेल्या सैनिकांचा ग्रामस्थांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा दासमे, जि.प. माजी सदस्य दिलिप सोमवंशी, वि का. सेवा संस्थेचे व्हाईस चेअमन सुंदर चव्हाण, सेवानिवृत्त सैनिक युवराज सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांनी गावातील सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवेत असलेल्या सर्वच सैनिकांचा यावेळी सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी सतिष सोमवंशी, संजय थिट्टे, अरविंद शिंदे, अर्जुन सोमवंशी, ज्ञानेश्वर सोमवंशी, पवन दासमे, यांच्यासह गावातील नागरिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित चव्हाण यांनी तर पवन दासमे यांनी आभर मानले.