मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभातफेरी काढण्यात आली होती. घोषणांनी मुलांनी गाव परीसर दणाणून सोडला होता.अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन गोरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मोघा गावचे सरपंच सचिन गोरे,शाळेचे माजी शिक्षक किसनराव वाघ, चंद्रकांत नांगरे, एस व्ही संगम नांदेड, दत्तात्रय दंडगुले, सचिन जरीकोट,पोलीस पाटील कुंडलिक पाटील,मुख्याध्यापक विकास घोडके हे उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे तळमळीने कार्य करून समाजमनात अजूनही आठवण ठेवणारे तसेच विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातुन गोडी लावणारे माजी शिक्षक चंद्रकांत नांगरे, संगम एस व्ही, दत्तात्रय दंडगुले,किसनराव वाघ यांना गावातर्फे सत्कार करून सन्मानित करण्यात आले.शालेय ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा इतिहास सर्वांसमोर मांडला.यावेळी शाळेतील २० विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शशिकांत संगम यांनी १९९५ची शाळा, गावकरी,याविषयी मनोगतातुन भावना व्यक्त केली.चंद्रकांत नांगरे यांनी आपल्या मनोगतातुन शाळेला गावातील प्रत्येकांनी सहकार्य करावे शाळा सुधारणेसाठी प्रत्येकांनी शाळेत येऊन शाळेच्या अडीअडचणी सोडवाव्यात असे आवाहन करून मोघा खुर्द येथील आठवणी कधीच विसरू शकणार नाही असे सांगितले.दंडगुले यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.यानंतर माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू दिल्या.
यावेळी माजी विद्यार्थी विक्री कर निरीक्षक मुस्तफा मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाहुराज सावळे,आनंदा हिरवे,नागनाथ मत्ते,गोपाळ गोरे, बब्रुवान भोंडवे,अमोल पाटील, बब्रुवान मत्ते, गंगाराम भोंडवे, बालाजी बाबळे, लक्ष्मण भोंडवे, दादा पवार, महंमद मुजावर,उग्रसेन दळवे,नेताजी शिंदे, गोपाळ दळवे, शशिकांत मत्ते, जगन्नाथ भोंडवे,गणेश मत्ते,अंगद भोंडवे, खंडोबा भोंडवे, सुरेखा भोंडवे, जिजाबाई गोरे,रेखा दळवे, अनिता बाबळे,मनिषा गोरे, कालिंदा मत्ते, मारुती भोंडवे,सुनिता मत्ते, चाॅंद मुजावर, महादेव भोंडवे,कल्याण पाटील,दत्ता गरगडे, शाम गरगडे,भरत मत्ते, कालीदास मोरे, सागर मोरे यांच्यासह माजी विद्यार्थी,नागरीक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरडे यु.व्ही यांनी केले तर आभार सचिन गोरे यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विकास घोडके,हमीद मुजावर, रईसा मुजावर,बरडे यु. व्ही,नितीन गोरे करण मत्ते यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!