धाराशिव
गणेशोत्सव 2025 : लोहारा पोलीस ठाण्याचे गणेश मंडळांना आवाहन
परवानगी प्रक्रियेसाठी 12 ऑगस्ट रोजी बैठक; ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक

लोहारा : पोलीस स्टेशन लोहारा हद्दीतील सर्व गणेश मंडळांना यंदाचा गणेशोत्सव कायद्याचे पालन करून आणि नियम व अटींच्या अधीन राहून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश मुर्ती स्थापना व विसर्जनासाठी परवानगी घेण्यासाठी मंडळांनी पोलीस स्टेशनकडे रितसर अर्ज करणे बंधनकारक असल्याचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी कळविले.
गणेशोत्सव 2025 साठी परवानगी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, मंडळांनी citizen portal वरील Maharashtra Police – Services for Citizen या पर्यायातून गणेश फेस्टिवल परमिशन अर्ज भरावा लागेल. अध्यक्ष किंवा सदस्याच्या नावाने लॉगिन आयडी तयार करून आवश्यक माहिती नमूद करावी.
अर्जामध्ये अध्यक्ष व सदस्यांची पूर्ण नावे, मोबाईल क्रमांक, स्थापना व विसर्जन दिनांक व वेळ, मिरवणुकीचा मार्ग, मंडपाची व मुर्तीची लांबी-रुंदी, देखावा, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती यासह सर्व तपशील भरावेत.
आवश्यक कागदपत्रे:
-
मंडळाची धर्मादाय आयुक्त कार्यालयाची नोंदणी पत्र
-
गेल्या वर्षीची परवानगी प्रत
-
सार्वजनिक जागेसाठी ग्रामपंचायत/नगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र किंवा खाजगी जागेसाठी जागा मालकाचे नाहरकत पत्र
-
तात्पुरत्या वीज कनेक्शनची पावती