उर्वरित 21 महसूल मंडळांना 25% अग्रीम रक्कम देण्याबाबत अनिल जगताप यांनी घेतली अप्पर मुख्य सचिव व आवर सचिव यांची मंत्रालयात भेट

धाराशिव : खरीप 2023 साठी राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना लागू केल्याने धाराशिव जिल्ह्यातील सात लाख 57 हजार 457 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला त्यापोटी शेतकरी राज्य शासन व केंद्र शासनातर्फे पिक विमा कंपनीला 516 कोटी रुपये देय रक्कम आहे
यावर्षी सुरुवातीला थोडासा पाऊस झाला त्यावरती बळीराजांनी पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने खूप मोठी ओढ दिली स्वाभाविकपणे पिके वाळू लागली पीक विमा शासन निर्णय 26 जून 2023 नुसार जर पावसाने 21 दिवसाचा खंड दिला तर अपेक्षित उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट येत असल्यास त्याला 25% अग्रीम रक्कम देण्याची तरतूद आहे.
जिल्हाधिकारी धाराशिव यांनी 01 सप्टेंबर 2023 रोजी एक परिपत्रक काढून धाराशिव जिल्ह्यातील एकूण 57 महसूल मंडळापैकी 36 महसूल मंडळाची 25% अग्रीम साठी निवड केली आहे मात्र अद्यापही 21 महसूल मंडळे बाकी होती दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अप्पर कृषी सचिव श्री अनुप कुमार यांना एक अहवाल पाठवून जिल्ह्यात 21 महसूल मंडळामध्ये देखील 60 टक्के पेक्षा जास्तीची घट येत असल्याचे अवगत केले आहे त्यामुळे पिक विमा शासन निर्णयानुसार ही मंडळी देखील 25% अग्रीम रकमेसाठी पात्र ठरतात तसेच जिल्ह्यात केवळ 42 ठिकाणीच हवामान केंद्रे अर्थात पर्जन्यमापक केंद्र आहेत शासन निर्णयानुसार प्रत्येक महसूल मंडळामध्ये एक पर्जन्यमापक यंत्र असायला हवे मात्र 15 महसूल मंडळामध्ये ते नाही त्यामुळे आकडेवारी ही वादाच्या भोवऱ्यात आहे.
यासाठी काल अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार व विमा विषयक महाराष्ट्राच्या कामकाज पाहणाऱ्या नीता शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व 21 महसूल मंडळाचा समावेश करण्याची विनंती केली त्यांनीही हा प्रस्ताव केंद्राकडे दिल्लीला पाठवून त्यावर संमती घेऊ असे मला आश्वासित केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 21 महसूल मंडळामध्ये 25% अग्रीम रक्कम देण्यात विषयी त्या मंडळाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती केली आहे अप्पर मुख्य सचिव यांनी हा हा प्रस्ताव दिल्लीला केंद्राकडे पाठवू असे मला आश्वासित केले 15 सप्टेंबर नंतर 21 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू प्रसंगी न्यायालयाची ही दरवाजे ठोठावू.
अनिल जगताप,राष्ट्रवादी माजी जिल्हा उपाध्यक्ष