जरांगे पाटीलाच्या उपोषणाला लोहारा तालुक्यातून प्रत्यक्ष भेट घेऊन पाठींबा

लोहारा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अचानक लाठीचार्ज झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला राज्यभर बंद पुकारण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी ६ सप्टेबर रोजी आंदोलनाच्या नवव्या दिवशी जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना हसुरे, मनसे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब रवळे, स्वराज्य संघटना उपाध्यक्ष तानाजी पाटील, गोविंद ढोबळे यांनी अंतरावली सराटी येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठींबा दर्शविला आहे.