महाराष्ट्र
तपसे चिंचोलीत खंडोबा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

औसा :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे रूढी परंपरेनुसार खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गावांत ७ दिवसांत जवळपास २५ अन्नदात्यांनी दिवसभरात दोन वेळच्या भोजन पंगतीची व्यवस्था केली होती.

यात्रा महोत्सव 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान पार पडला. 1 डिसेंबर रोजी माऊली संगीत क्लासेस यांचा भजनाचा कार्यक्रम ,2 डिसेंबर रोजी सत्संग , 3 डिसेंबर रोजी गावकरी भजन , 4 डिसेंबर रोजी औराद येथील महेश वाघे यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम , 5 डिसेंबर माऊली ब्लड बँक आयोजित रक्तदान शिबीर , 6 डिसेंबर रोजी खंडू वाघे राजुरीकर यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम ,असे कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
सांगतेच्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मोहन राघोबा नेटके, अंगद रखमाजी नेटके यांच्या हस्ते श्री ची पूजा करून आरती सबिना सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी गावातील भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.