लोहारा : लोहारा शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे तर उपाध्यक्षपदी आकाश विरुदे यांची निवड करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे,उपाध्यक्ष आकाश विरुधे, सचिव प्रदीप घोडके, सहसचिव अमित महानुर,कोषाध्यक्ष श्रीकांत तिगाडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रताप घोडके, जगदीश लांडगे, मनोहर वाघमोडे, सुरेश पांढरे, विकास घोडके, बालाजी विरुधे,दगडू तिगाडे यांच्यासह रघुवीर घोडके, सुधीर घोडके, प्रशांत लांडगे, अप्पा देवकर, अंबादास विरुदे, विजय महानुर, महेश वाघे, जयसिंग बंडगर, पांडुरंग घोडके, प्रश्नांत थोरात, अंकुश बंडगर, संदीप घोडके, अनिल विरोधे, कृष्णा वीरुदे, काका घोडके, अजय घोडके, राहुल विरुदे, सुमित महनुर, धवल खताळ, हर्षवर्धन खताळ, नितीन वाघे, शिवा तीगाडे, महेश घोडके, ऋषिकेश तिगाडे, वैभव घोडके, बाळासाहेब घोडके, गोपाळ घोडके, ओमकार लांडगे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाज एकतेचा व प्रगतीचा संदेश देण्यात आला व भविष्यात समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली.