लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा 

लोहारा  : लोहारा शहरासह तालुक्यातील अनाधिकृत देशी विक्री सह गुटखा तसेच शहरातील केमिकल युक्त शिंदी चे अनाधिकृत दुकाने 22 डिसेंबर पर्यत बंद न झाल्यास पोलीस ठाणे समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना लोहारा पोलीस ठाणे यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
सदर दिलेल्या निवेदनात लोहारा तालुक्यामध्ये तसेच जेवळी, माकणी सास्तुर कानेगाव कास्ती नागुर तोरंबा सह आदी गावातील विना परवाना देशी दारू तात्काळ बंद करण्यात यावे त्याच बरोबर लोहारा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बिन बोभाट ताडी केमिकल युक्त सिंधी चे दुकान चालू आहे या केमिकल युक्त सिंधी ताडीमुळे अनेक युवक व्यसनाधीनतेमध्ये भरकटत चालले आहेत.
या सर्वांना अभय मिळत असल्याने सदर अवैध धंदे फोपावले आहेत तर शहरासह तालुक्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून मोठे जाळे पसरले असून यामुळे या गुटख्याच्या अधीन युवा पिढी व्यसनाधीनते मध्ये भरकटत जात आहेत.
त्यातच शहरातील या केमिकल शिंदी मुळे अनेक युवक मद्यधुंद होत आहेत याचा विपरीत परिणाम त्यांच्या कुटूंबावर होत आहे. तर यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे तर सदर दुकान हे अनाधिकृतपणे भर चौकात वस्ती असलेल्या ठिकाणी सुरू असताना देखील पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे .अनाधिकृत व्यवसायावर एखादे खटले दाखल केले जाते पुन्हा हा व्यवसाय जोमाने सुरू केले जाते. तसेच अनाधिकृत रासायनिक केमिकल युक्त शिंदीचें दुकान चालवणाऱ्याला दुकानदाराला मुभा दिली जाते यामुळेच सदर अवैध धंदे बिन बोभाटा सुरू आहेत.नशा आणि गुटख्याच्या अधीन तर युवा पिढी गेलीच आहे शिवाय युवक रासायनिक केमिकल युक्त शिंदी च्या अधीन जात असल्याने समाजाप्रती पोलिसांवरून विश्वास उठत चालले आहे.
यासाठी संबंधित पोलीस उपअधीक्षक यांनीच तात्काळ सदर दुकान बंद करण्यासाठी प्रयत्न करावे व तात्काळ सदर दुकान मालकावर गुन्हा दाखल करून पुढे असे कृत्य करू नये यासाठी कायदेशीर बाबी कडक कारवाई करावी व पुन्हा सदर दुकान चालू झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना जबाबदार धरावे.
सदर तालुक्यासह शहरातील अवैध पूर्ण व्यवसाय बंद करावे सदर अवैध व्यवसाय दिनांक 22 डिसेंबर पर्यंत बंद न झाल्यास सामाजिक हित जोपासत लोहारा पोलीस ठाण्यासमोर लोकशाही पद्धतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील
असे निवेदनात नमूद केले असून या निवेदनावर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष बालाजी यादव, तालुका का.आ.अध्यक्ष किरण सोनकांबळे, तालुका सोशल मिडिया अध्यक्ष लक्ष्मण लोहार, तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष खंडू शिंदे, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गणेश सुरवसे, शहर अध्यक्ष पदमाकर चव्हाण, उपाध्यक्ष स्वप्नील गुंड, शरद जावळे, अभिजित सूर्यवंशी लक्ष्मण पवार, सचिव सत्यजित मुसांडे. ओमकार चव्हाण, अब्बास कारभारी, विजय जाधव, अमोल बिराजदार, संजय खरूसे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

जाहीरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!