जेवळी येथे महात्मा बसवेश्वरांच्या याञा निमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा समारोप

जेवळी, (ता.लोहारा)

जेवळी येथील महात्मा बसवेश्वरांच्या याञा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत राजभरातून आलेल्या कलाकारनी विविध गितावर उत्कृष्ट नृत्याचा कलाआविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवारी (ता.२१) या नृत्य स्पर्धेचा समारोप समूह नृत्य स्पर्धेने करण्यात झाला. यावेळी विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आला.
येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. या प्रसंगी विविध संस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम होतात. बुधवार (ता.१९) ते शुक्रवार (ता.२१) या काळात तीन दिवशीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेा पार पडल्या. यावेळी या स्पर्धेत राज्यस्तरावरील नामवंत कलाकार सहभागी झाले होते. यात लावणी, आराधी, गोंधळी, भरतनाट्यम, देशभक्ती गीत, रिमिक्स अशा विविध गितावर तरूणाईंचे पाय थिरकले.

HTML img Tag Simply Easy Learning

एकाहून एक दर्जेदार नृत्य सादर करून उपस्थित रसिंकांची वाहवा मिळवली. या नृत्य स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (ता.२१) समूह नृत्याने करण्यात झाला. या नृत्य समारोपाचे उद्घाटन माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग मासुडे हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, चन्नबसवा फार्मसी कॉलेजचे (बसवकल्याण) सचिव सुनील देशमुख, पंचायत समिती माजी सभापती बुद्धिवंत साखरे, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुणवंत कारभारी, कृषी अधिकारी दीपक जाधव, सत्तेश्वर ढोबळे, उमेश डिग्गे, अविनाश कोरे, रेवणसिध्द करदंटे, गणेश कारभारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाण- बुधवारी (ता.१९) पार पडलेल्या बालगट वैयक्तिक नृत्य स्पर्धा, प्रथम पारितोषिक- ऋषिकेश मुंदडा (अंबाजोगाई) व आस्था डांगे (अंबाजोगाई) तर द्वितीय – हिंदवी चौरे (नांदेड) व कृष्णा तंदुरे (लातूर) यांना विभागून पारितोषिक देण्यात आले. बाल गट समुह नृत्य स्पर्धा, प्रथम पारितोषिक- आर्यन ग्रुप अकॅडमी (कुर्डवाडी), द्वितीय – आर्यन ग्रुप डान्स अकॅडमी (लातूर) यांनी पटकाविले. गुरुवारी (ता.२०) प्रौढ गटातील लावनी व वैयक्तिक नृत्य स्पर्धा पार पडली. यात स्त्रीगटसाठी – प्रथम पारितोषिक- अनामिका अहिरे (बीड) व सुप्रिया पाटील (बीड) तर द्वितीय- सानिका भागवत (सातारा), व साक्षी आंधळे (बीड) यांना विभागून पारितोषिक देण्यात आले.

पुरुष गट (प्रौढ) लावणी व वैयक्तिक नृत्य स्पर्धां- प्रथम पारितोषिक- इब्राहिम शेख (लातूर) व किरण मांडके (बीड), द्वितीय- शुभम बोराडे (नागपूर) व किशोर नवगिरे (लातूर) यांना विभागून देण्यात आले. शुक्रवारी (ता. २१) खुल्या गटातील युगल नृत्य प्रथम पारितोषिक- दिनेश- गणेश (औरंगाबाद) व गौतमी- ऋषी (सोलापूर), द्वितीय- कला श्री अकॅडमी ग्रुप (बीड) व दिनेश- इब्राहिम (लातूर) यांना पारितोषिक (विभागून) देण्यात आले. प्रौढ गटातील समुह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक- सांस्कृतिक ग्रुप (बीड) व साई कला ग्रुप (रायगड), द्वितीय- डी डी एस ग्रुप (पंढरपूर) व शुभम डान्स अकॅडमी (लातूर) यांनी पारितोषिक (विभागून) पटकाविले आहे.


यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!