जेवळी येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त बैलजोड्यांची मिरवणुक

जेवळी, ( ता.लोहारा ) : जेवळी (ता लोहारा) ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवारी (ता २२) पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलिंगाची रुद्रभिषेक व पंचकलश पूजेनी सुरवात झाली. सकाळी दहा वाजता सालाबाद प्रमाणे परिसरातील अनेक पशुधन व बैलजोड्यांची गावाततून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून उत्कृष्ट पशूंना पारितोषिके देण्यात आली. बैलजोड्यांची मिरवणुक हे यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण असते.


जेवळी येथे महात्मा बसवेश्वरांच पुरातन मंदिर असून येथे जयंती यात्रेच्या स्वरूपात साजरी केली जाते. तीन दिवास चालणाऱ्या या यात्रा मोहत्सवाची सुरूवात शनिवारी (ता.२२) पाहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलींगाची पंचकलश पुजा, रुद्राअभिशकाने झाली. सकाळी आठ वाजता येथील काशिनाथ स्वामी यांच्या घरी बसवेश्वरांच्या पाळण्याचा कार्यक्रम पार पडला. दहा वाजता परिसरातील पशु पालकानी आणलेल्या पशुधन व बैलजोड्यांची गावातील मुख्यरस्त्यावरुन सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या पशुंना बैलपोळा प्रमाणे मोठ्या प्रमाणात सजविण्या आले होते. ही मिरवणूक मंदिर परिसरात गेल्या नंतर जिल्हा स्तरीय पशु प्रदर्शन पार पडले. यावेळी उत्कृष्ट पशुंच्या पालकाना गट निहाय पारितोषिके देण्यात आले आहे. ही पारितोषिके या परिसरातील शेतकरी वर्गात मानाचे समजले जातात. कांही पशुपालक तर यात्रेत पारितोषिके मिळावी म्हणून पशुधन साभांळत असतात.

उत्कृष्ट पशुपालकांचे गटनिहाय नावे अशी – खिल्लार बैल जोडीः प्रथम विलास कारभारी -,द्वितीय- गुणवंत कारभारी, खिल्लार खोंड जोडीः रमेश होणाजे , द्वितीय – विश्वनाथ इ. हवळे, जवरी बैल जोडीः प्रथम – तानाजी गाडेकर, द्वितीय- पंडित कारभारी, जवरी खोंड जोडीः प्रथम – महादेव मोघे, द्वितीय- उमा माळी, जरशी (संकरीत) बैल जोडी पथम – निलाप्पा राठोड, द्वितीय- रणवीर पाटील, देवणी बैल जोडी प्रथम- वैजनाथ हावळे, द्वितीय- इस्माईल शेख, वयस्क जवारी बैल जोडी प्रथम- बाबू माळी, द्वितीय संजय पणुरे, वयस्कर खिल्लार बैल जोडी- विलास कारभारी, द्वितीय- सचिन कारभारी, जवारी गाय प्रथम- शिवा चवले, द्वितीय- सतीश राठोड, खिल्लार गाय प्रथम- गुणवंत कारभारी, द्वितीय विलास कारभारी, जरशी गाय प्रथम रमेश हावळे, द्वितीय- ज्ञानदेव जांभळे, गिर गाय प्रथम- अभय कुलकर्णी, द्वितीय शिवलिंगप्पा धरणे याबरोबरच जवारी, खिल्लार, संकरित, देवणी सिंगल खोंड, कारवड, घोडा आदी उत्कृष्ट पशुधनास बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट पशु निवढीसाठी निरीक्षक म्हणून गुणवंत कारभारी, सूर्यकांत पणुरे, श्रीशैल कोराळे, महादेव होनाजे, बाबूराव माळी, राजेंद्र गाडेकर, नागनाथ चवले, श्रीशैल्य भैरप्पा आदींनी काम पाहीले. या नंतर पारितोषिक प्राप्त पशुंचे पशुपालकाकडून मंदिरापासुन आपल्या घरापर्यंत हलक्याच्या कडकडाट, गुलालाची उदळन करीत मिरवणूक काढण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!