लोहारा शहरात खड्डयात बेसरमाचे झाड लावुन शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन

लोहारा : लोहारा शहरातील मुख्य रस्ता व महामार्गावरील पडलेल्या खड्डयात बेसरमाचे झाड लावुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
लोहारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन दडी दिलेल्या पावसाने दमदार सुरवात केली आहे.यावेळी लोहारा शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्डयामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
लोहारा शहारातील महात्मा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा बस्वेश्वर चौक ते एल जी पेट्रोलपंप या रस्तावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर सार्वजणीक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजवुण घेणे गरजेचे होते.वेळोवेळी सांगुनही सार्वजनीक बांधकाम विभागाने जानीवपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी लहाण मोठे अपघात होत आहेत.रात्रीच्या वेळी शिवनेरी हॉटेल समोरील खड्डा नाही दिसल्यामुळे दुचाकीस्वार या खड्डयात पडुन किरकोळ व मोठि दुखापतही झाली आहे.
यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवनेरी हॉटेल समोरील खड्डांच्या बाजुला रांगोळी काडुन व या मुर्दाड प्रशासनाला जागे करण्यासाठी खड्डयात बेसरमाचे झाड लावुन निषेध करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने रस्तांच्या दोन्ही बाजुने वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.वाहणधारक व नागरीकही मोठ्या संख्येने जमा झाले होते.
यावेळी सार्वजनीक बांधकाम विभाग व झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी व मुर्दाड अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हलगी लावुन त्यांच्याविरोधात घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सांगीलतले की लोहारा शहरातील मुख्य रस्तांवर पडलेले खड्डे येणार मागिल वेळेसही सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकार्याना सांगीतले असता त्या खड्डयामध्ये काळी मातीमिश्रीत खडक टाकुन टाळुला लोणी लावण्याचे काम करण्यात आले पन यावेळेस आठ दिवसात खडीकरण करुन मजबुतीकरण केले नाही व असाच त्रास नागरीकांना होत राहिल्यास लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल यातुन काही अनुचित प्रकार घडल्यास सार्वजनीक बांधकाम विभाग व प्रशासन जबाबदार असेल.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार,शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,माजी नगरसेवक श्याम नारायणकर, श्यामसुंदर तोडकरी,माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी,माजी वि.का.से.सो.सदस्य रघुवीर घोडके, तुकराम वाकळे,युवासेना सोशल मिडीया तालुका प्रमुख प्रेम लांडगे, मेडीकल असोशियशनचे माजी तालुका अध्यक्ष भरत सुतार,सचिन ढोणे,राजू फावडे, महेश बिराजदार, महेबुब शेख ,दगडू माटे,परमेश्वर पाटील, साहेबलाला शेख,अमोल मुसांडे,गंगाराम भोंडवे, प्रवीण गोरे यासह शिवसैनीक, वाहणधारक व नागरीक उपस्थित होते.