ट्रकच्या धडकेने मोटार सायकलवरील विद्यार्थी जागीच ठार

उमरगा (उस्मानाबाद ) :नारायण गोस्वामी

उमरगा – लातूर रोडवरील लक्ष्मीपाटी जवळ एका मिनी हायवा ट्रक ने दुचाकीवरुन कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एका २० वर्षीय विद्यार्थांचा जागेवरच म्रूत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे . हा अपघात सकाळी ९ च्या सुमारास घडला असून आरोपी ट्रक ड्रायव्हर हा पळून गेला .

याबाबत माहिती अशी कि ,नाइचाकुर येथील आरोग्य कर्मचारी संभाजी भांगे यांचा मुलगा गणेश भांगे हा शनिवारी सकाळी आपल्या मित्रासह दुचाकीवरून , बिरुदेव मंदिर शेजारी असणाऱ्या शिवाई बी फॉर्मसी कॉलेजला जात होता .उमरगा – लातूर रस्त्यावरील , कोरेगाव शिवारातील लक्ष्मी पाटी जवळ एम एच – २५ ए जे – ३३०५ या डस्ट वाळू वाहतूक करणाऱ्या मिनी हायवा ट्रक ने दुचाकीस मागून जोरदार धडक दिली .

HTML img Tag Simply Easy Learning

यात गणेश संभाजी भांगे वय वर्षे हा जागीच ठार झाला तर कृष्णा अभिमन्यू जाधव वय २० राहणार नारंगवाडी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अपघात होताच मिनी हायवा ट्रकचा ड्रायव्हर हा जखमीना मदत न करता पळून गेला . यानंतर नाणीज महाराज यांच्या सेवाभावी रुग्णवाहिका मधून दोघांना उपचारासाठी आणण्यात आले .


अपघाताची माहिती समजताच शिवाइ कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती तर अवघ्या २० वर्शाचा तरुण विद्यार्थी मृत पावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!