धाराशिवराजकीय

पंचायत समिती लोहारा निवडणूक २०२६ | भातागळी गणातून सुयशकुमार दंडगुले अपक्ष लढविण्यास सज्ज

लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत भातागळी पंचायत समिती गणातून कास्ती बु. येथील तरुण नेतृत्व सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून इच्छुक असूनही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष मार्ग स्वीकारला असला तरी, त्यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद हा केवळ वैयक्तिक ओळखीपुरता मर्यादित नसून, वडील शिक्षक म्हणून त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या समाजकार्याची शिदोरी आज मुलाच्या पाठीशी उभी राहताना दिसत आहे, अशी चर्चा भातागळी गणात रंगली आहे.

सुयशकुमार दंडगुले यांचे वडील शिक्षक म्हणून सेवेत असताना शिक्षण, सामाजिक सलोखा, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, गरजू कुटुंबांना मदत आणि गावाच्या सार्वजनिक प्रश्नांमध्ये पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या निस्वार्थ समाजकार्यामुळे निर्माण झालेला विश्वास व सन्मान आता सुयशकुमार यांच्या राजकीय प्रवासाला बळ देत असल्याचे चित्र आहे. “शिक्षकाने पेरलेली सामाजिक भांडवलाची बीजे आज राजकारणात फळाला येत आहेत,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे.


भातागळी गणासह परिसरातील गावांमध्ये सुयशकुमार दंडगुले यांनी गावभेटी, थेट संवाद आणि तरुणांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रचारात मोठ्या घोषणा नसून शिक्षण, पायाभूत सुविधा, युवकांना संधी, पारदर्शक कारभार यावर केंद्रित मुद्दे पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध स्तरांतून त्यांना सकस व वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.


लोहारा पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव असून भातागळी पंचायत समिती मतदारसंघही ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे येथून विजयी ठरणारा उमेदवार सभापती पदाचा दावेदार ठरण्याची शक्यता आहे. यामुळेच भातागळी गणाची लढत अधिकच निर्णायक बनली असून सुयशकुमार दंडगुले यांचे नाव चर्चेत आले आहे.
सातत्याने पक्षासाठी कार्य करूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत असली तरी, त्यांनी वैयक्तिक कटुता बाजूला ठेवत जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. “वडिलांनी शिक्षक म्हणून समाजाला दिलेले योगदान हीच माझी खरी राजकीय शिदोरी आहे,” अशी भावना त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होत आहे.

परिचय थोडक्यात :
नाव : सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले
मूळगाव : कास्ती बु., ता. लोहारा, जि. धाराशिव

शिक्षण : BTech (Civil), NDA २०२२ (Interview Out)
प्रशिक्षण : IIDL (रामभाऊ महालगी प्रबोधनी, मीरा भाईंदर)

भाजप दायित्व : माजी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आत्मनिर्भर भारत तालुका संयोजक, हर घर तिरंगा मंडळ संयोजक रा. स्व. संघ व सामाजिक

दायित्व : माजी तालुका बौद्धिक प्रमुख,

बजरंग दल माजी जिल्हा सुरक्षा प्रमुख, शौर्य प्रशिक्षण वर्ग शिक्षित

शिक्षक वडिलांच्या समाजकार्याची शिदोरी आणि तरुण नेतृत्वाची उर्जा—या दोन्हींच्या संगमामुळे भातागळी गणातील ही निवडणूक केवळ राजकीय न राहता सामाजिक विश्वासाची कसोटी ठरत असल्याचे चित्र सध्या लोहारा तालुक्यात दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!