धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले . आज दिनांक 04/10/2024 रोजी जिल्हा परिषद धाराशिव चे कर्तव्यदक्ष स्वच्छ प्रतीमेचे गतिमान प्रशासक मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री मैनाक घोष साहेब यांनी जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी यांचे मागील एक वर्षापासून प्रलंबित विविध न्याय मागण्या सोडवणूक करून आदेश पारित केले. मागील एक वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा धाराशिव चे जिल्हाध्यक्ष श्री महादेव जगताप व जिल्हा सरचिटणीस श्री सुदर्शन घोगरे व त्यांची संपूर्ण टिम ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवणूक करण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे सतत पाठपुरावा करत होते संवर्गाचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी संघटनेच्या वतीने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा डॉ श्री मैनाक घोष साहेब यांची भेट घेऊन ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या न्याय मागण्या सोडवणूक करणे संदर्भात दिनांक 20/09/2024 सकारात्मक चर्चा होऊन कालबद्ध कार्यक्रम आखूनच दिला त्यानुसार जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सा ) मा श्री सूर्यकांत भुजबळ साहेब व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा शाम गोडभरले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक मा प्रमोद कांबळे साहेब ग्रामपंचायत अधिकारी आस्थापना वरीष्ठ सहाय्यक गवळी साहेब गुरूनंद बिराजदार साहेब ऋषिकेश कुलकर्णी साहेब या सर्वांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करू सर्व न्याय मागण्या सोडवणूक करणे कामी यशस्वी प्रयत्न केले.

खालील प्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या सोडवणूक केलेल्या न्याय मागण्या 1) कालबद्ध पदोन्नती–10 वर्ष सेवा झालेले-15 ग्रामपंचायत अधिकारी व 04 विस्तार अधिकारी यांना पदोन्नतीचा लाभ 20 वर्ष सेवा झालेले- 08 . 30 वर्ष सेवा झालेले- 06 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमधून विस्तार अधिकारी पदोन्नती झालेले- 01 2) ग्रामविकास अधिकारी पदोन्नती झालेले–08 3) निलंबित ग्रामपंचायत अधिकारी यांना पुनर्स्थापित करणे -07. 4) 2008-09 मधील पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना एक विशेष वेतन वाढ–09. 5) मागील पाच वर्षातील गोपनीय अहवालाची एक छायांकित प्रत सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना देणे बाबत. 6) आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार 22 -23 व23 -24 वितरण सोहळा आयोजित करणे बाबत 7) ग्रामपंचायत अधिकारी सेवा पुस्तिका पडताळणी 8) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर नियुक्त ग्रामपंचायत अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व जीपीएफ खाते उघडणे बाबत 9) दिनांक 24/09/024 रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांची नवीन वेतनश्रेणी लागू करणे बाबत. 10) 3 वर्ष कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या ग्रामसेवकांना नियमित ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याबाबत–07 11) ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रलंबित वैद्यकीय देयकाबाबत वरील प्रमाणे सर्व 01 ते 11 न्याय मागण्या सोडवणूक झाल्याबद्दल दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री मैनाक घोष साहेब मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) श्री सूर्यकांत भुजबळ साहेब मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) श्री श्याम गोडभरले साहेब पंचायत विभागाचे अधीक्षक श्री प्रमोद कांबळे साहेब ग्रामपंचायत अधिकारी आस्थापना वरीष्ठ सहायक श्री निवा गवळी सर्वांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सर्व मागण्या मंजूर झाल्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Back to top button
error: Content is protected !!