धाराशिव

निम्न तेरणा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र विरोध करणार – सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप

धाराशिव : निम्न तेरणा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र विरोध करणार सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा दिला आहे.

माकणी ता. लोहारा येथील निम्न तेरणा प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात मंत्रालय मुंबई येथे 12 फेब्रुवारी रोजी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीदरम्यान अतिरिक्त भूसंपादन न करता सुरुवातीला उंची वाढवण्या संदर्भात चाचपणी करण्यात आली आहे. निम्न तेरणा प्रकल्पात पाणी साठवण क्षमते पैकी जवळपास 30 टक्के गाळ साचला असल्याने प्रकल्पाची पाणी क्षमता कमी झाली आहे. सदरील प्रकल्पाची पाणी क्षमता 130 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. नाशिकच्या मेरी या संस्थेने केलेल्या गाळ सर्वेक्षणातून प्रकल्पात जवळपास 30 टक्के गाळ साठला असल्याचा अहवाल यापूर्वी दिला आहे.

निम्न तेरणा प्रकल्पाची निर्मिती सन 1989 रोजी करण्यात आली. प्रकल्पाची निर्मिती करताना देखील धरणासाठी भूसंपादित करण्यात आलेली जमीन ही काळी असल्याने गाळ साठण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती मात्र तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी त्याला जुमानता धरणाची निर्मिती केली. काळी जमीन असल्यामुळे अल्पावधीतच धरणात 30 टक्के गाळसाठा झाला आहे त्याचा परिणाम पाणी क्षमतेवर झाला आहे.

धरणाची उंची वाढवायची म्हटलं तर जमीन संपादित करावी लागणार आहे कारण आत्ता धरण 100% पूर्ण भरले तरी संपादित न केलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करत आहेत. जमीन संपादित न करता उंची वाढवली तर स्वाभाविकपणानं शेतकऱ्याच्या शेतात पाणी साठणार आहे. यापूर्वीच या धरणासाठी भातागळी, माकणी,कानेगाव, मसलगा, नागूर , कमालपूर, उजनी, मातोळा, वांगजी, लोहटा या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. या भागातील शेतकऱ्याकडे आता अतिशय अल्प अशा जमिनी शिल्लक राहिलेल्या आहेत उंची वाढवायची ठरली तर त्याही जमिनी जातील अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागेल त्यामुळे उंची वाढविण्याला विरोध करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केली आहे.

या धरणातूनच औसा, निलंगा उमरगा या शहराला पाणीपुरवठा होतो तर लवकरच लोहारा शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच या परिसरातील जवळपास 68 खेड्यांना विविध पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो मात्र एका सत्ताधारी आमदाराने बेलकुंड येथून उपसा सिंचन योजना राबवून धरणातील पाणी नेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी उंची वाढवण्याचा घाट घातला जात आहे.
उंची वाढवण्यासाठी जर भूसंपादन करण्यात येणार असेल तर त्याला या भागातील शेतकऱ्याचा कडकडीत विरोध राहणार आहे.

यापूर्वीही सन 2011 मध्ये निम्न तेरणा प्रकल्प माकणी धरणातून पाणी आरक्षण करून शिंदाळा टेंभी तालुका औसा येथील नियोजित भेल महाजनको या प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करून वीस दशलक्ष घनमीटर पाणी नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र सर्व पक्षांना सोबत घेऊन आंदोलन करून तो प्रयत्नही आपण हाणून पाडला आहे.

 

लवकरच धरण उंची विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात येणार असून. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक शिष्टमंडळ नेऊन जलसंपदा मंत्र्यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती त्यांना अवगत करणार आहोत प्रक्रिया नाही थांबल्यास खूप मोठे आंदोलन उभे केले जाईल.

अनिल जगताप सामाजिक कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!