धाराशिव
भातागळी येथे होणार खासदार, आमदारांचा सत्कार

लोहारा ( धाराशिव ) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भातागळी तालुका लोहारा येथे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील ,आमदार प्रवीण स्वामी यांचा नागरी सत्कार व शंभू महादेवाच्यामहापूजेचे आयोजन.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर तर विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या नागरी सत्काराचे दिनांक 5 जानेवारी सायंकाळी सहा वाजता भातागळी तालुका लोहारा येथे आयोजन करण्यात आले असून त्याच वेळेस ग्रामदैवत शंभो महादेवाची महापूजा तसेच नवस पूर्ती निमित्त नंदी सोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या तसेच शंभू महादेवाच्या भक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान सत्कार समितीतर्फे करण्यात आले आहे.