महाराष्ट्र
ऑल इंडिया केमिस्ट ड्रगिस्ट अधक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचा ७५ व्या वाढिवसानिमित्त रक्तदान शिबिर

लोहारा दि.२५ (प्रतिनिधी) : गणेश खबोले
ऑल इंडिया केमिस्ट ड्रगिस्ट अधक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचा ७५ व्या वाढिवसानिमित्त लोहारा शहरातील भारत माता मंदिरात दि.२४ रोजी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो जिल्हा अधक्ष धनाजी आनंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जनकल्याण समिती चे संघ प्रचारक शंकर जाधव यांचा हस्ते आयुर्वेद देवता धन्वंतरी व भारत माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.




