भारत जोडो अभियान याञा पूर्वतयारीची युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांनी केली पहाणी

हिंगोली : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली “भारत जोडो यात्रा” हिंगोली जिल्ह्यातून दि. ११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान मार्गस्थ होत आहे.
पूर्वतयारी निमित्त आढावा बैठक नियोजन कार्यक्रमाचे स्थळ पहाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील व आमदार प्रज्ञाताई सातव यांनी पहाणी केली.
याप्रसंगी खा.स्व.राजीव सातव यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महेश देशमुख,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी, हिंगोली युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी कर्डिले ऋषीकेश देशमुख उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,उपाध्यक्ष यशपाल कांबळे, उमरगा सभापती सचिन पाटील,
उमरगा उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस मा.जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हानंद पाटील, नगरसेवक महेश माशाळकर, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस सचिव राजूभाई मुल्ला, जिल्ह्यातील युवक काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.