धाराशिव
लोहारा तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

लोहारा ( धाराशिव )आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातुन समाजाला,देशाला दिशा देण्याचे काम केले जाते.चांगल्या कार्यावर भरभरुन लिहणे,जेथे अन्याय होतोय तेथे वाचा फोडण्याचे काम याच पत्रकार बांधवांच्या माध्यमातुन केले जाते.
एक आद्य कर्तव्य म्हणुन लोहारा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्रकार मा.निळकंठ कांबळे,मा.जसवंतसिंग बायस, मा. बालाजी बिराजदार,मा. गिरीश भगत, मा. एकबाल मुल्ला,मा.आब्बास शेख,मा. अशोक दुबे, मा.यशवंत भुसारे,मा.गणेश खबोले,मा.सदाशिव जाधव ,मा.आदम पठाण,मा.कालिदास गोरे,मा.तानाजी माटे,मा.विक्रांत संगशेट्टि,मा.सुमित झिंगाडे, मा.सुनिल ठेले,मा. बसवराज होनाजे,मा.सुधीर कोरे,मा.रामचंद्र गायकवाड या पत्रकार बांधवांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी मा.प.सं.सदस्य चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख राजू तोडकरी, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार म्हणाले आज देशाची ही स्थिती आपन सर्वत्र पाहात आहोत आजच्या या काळात याच लेखणीच्या माध्यमातुन हुकुमशाहीच्या विरुद्ध वाचा फोडुन लोकशाही जपण्याचे काम याच पत्रकार बांधवांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.आजच्या डिजीटल युगामध्ये बातम्याची विश्वासार्य पत्रकारीता याच प्रिंट मिडीयाच्या माध्यमातुन करण्यात येते.कोणत्याही दबावाला न जुमानता चुकीचे तेच चुकीचे आहे अस ठणकावुन सांगुन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार बांधव्याच्या माध्यामतुन केले जाते.आम्हाला घडवण्याचे कामही हेच पत्रकार करतात असे सांगितले.आम्ही केलेली कामे लोकांपर्यत पोहचणे खुप आवश्यक असते या सर्वाच्या माध्यामातुन आम्ही सर्व लोकांच्या जवळ पोहचत असतो.आम्हाला घडवण्याचे काम यांच्याच माध्यमातुन होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.प.स.सदस्य चंद्रकांत पाटील,काँग्रेसचे तालुकाप्रमुख राजू तोडकरी, शिवसेना (उबाठा)तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक प्रशांत काळे,शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटिल, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी नगरसेवक शाम नारायणकर ,शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,विभागप्रमुख बालाजी जाधव,शिवदुत पंडीत बारगळ, शिवदुत महेबुब गंवडी,माजी वि.का.से.सो. सदस्य रघुविर घोडके,रौफ बागवान,इनुस मुल्ला,ओम पाटील,वीरभद्र फावडे, नितीन जाधव,विजय फावडे,बालाजी माशाळकर, प्रेम लांडगे, राजू स्वामी, अभिषेक स्वामी यासह शिवसैनिक उपस्थित होते.



