बालविवाह मुक्त भारत विशेष युवक शिबीरातंर्गत स्वच्छता

लोहारा ( जि.धाराशिव ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छत्रपती संभाजी नगर व भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था लोहारा संचलित शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मार्डी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे प्राचार्य शेषेराव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बालविवाह मुक्त भारत विशेष युवक शिबीर दि.23/01/2024 ते 29/01/2024 पर्यंत चालू आहे. तरी या शिबिराचे , पुरातन बारव विहिरीत स्वच्छ करून झाड झुडप स्वच्छ करण्यात आले. तसेच गावातील मारुती मंदिर परिसरातील गटारी स्वच्छ करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning
यावेळी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील व प्रतापराव माने , बी. बी. भोसले, मुख्याध्यापक प्रविण पाटील चेअरमन ( वि. का स सो. मार्डी.) यांच्या हस्ते आश्रम शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बालाजी राजोळे , प्रा. भैरवनाथ मोटे, यांनी प्रयत्न केले . प्रा. दत्ता कोटरंगे डॉ. शिवाजी कदम,डॉ मनोज सोमवंशी, डॉ. छाया कडेकर,डॉ. पार्वती माने, डॉ. संदीप कोरेकर,प्रवीण पाटील , परमेश्वर कदम, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!