धाराशिव

जिल्हा परिषद शाळांना डिजिटल बोर्ड, विद्यार्थ्यांना आरओ फिल्टर द्या!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश चंदनशिवे यांची आमदार प्रतापसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

लोहारा : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी प्रत्येक शाळेत इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष शैलेश चंदनशिवे यांनी आमदार प्रतापसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही अनेक ठिकाणी आधुनिक शैक्षणिक सुविधांचा अभाव जाणवतो. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सोपे, रंजक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याची गरज आहे. इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना चित्रे, व्हिडिओ, अॅनिमेशन आणि विविध शैक्षणिक सादरीकरणांच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. त्यामुळे अवघड विषयही सहज समजण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांची अध्ययनातील रुची वाढून ग्रामीण आणि शहरी शाळांमधील डिजिटल शिक्षणाची दरी कमी होण्यास हातभार लागेल.

दुसरीकडे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे ही मूलभूत गरज आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद शाळांमध्ये आरओ फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छतेलाही प्राधान्य मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यांना शाळेतच शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करून या मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, प्रदेश सचिव रोहित बागल, भागवत भंडारकर, ऋषिकेश कदम, सूरज वडवले, नवनाथ मोटे, विजय सिंह गोगरे, नगरसेवक पंकज भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!