धाराशिव

रीपाई (आठवले गट) रोजगार आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन

लोहारा ( जि.धाराशिव ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल अवामन करणारे शब्द वापरल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करीत लोहारा तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी १९ डिसेंबर रोजी रीपाई (आठवले गट) रोजगार आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारो अंदोलन करण्यात आले.

यावेळी रीपाई ( आठवले गट ) रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, दत्ताभाऊ गायकवाड, गजेंद्र डावरे, तुकाराम वाकळे, काकासाहेब भंडारे, तुकाराम कदम, कल्लाप्पा दुपारगुडे, आण्णाराव कांबळे, अर्जुन मुक्के, वसंत सुरवसे, दगडू कांबळे, नितिन सितापुरे ,सर्जेराव बनसोडे, संघर्ष सोनवणे, शरद मस्के,दयानंद माने आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!