पार्वती मल्टीस्टेट मध्ये नूतन सल्लागाराचा सत्कार

लोहारा : शहरातील पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा लोहारा येथे नवीन सल्लागार पद निवड प्रक्रिया पार पाडली.
पार्वती मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष माननीय आबासाहेब साळुंखे, संचालक कल्लेश्वर जाधव, सिंदफळे दिलीप यांच्या लक्षात येता संस्थेच्या आर्थिक उन्नती मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल संस्थेच्या मासिक ठराव मध्ये सल्लागार या पदावर नेमणूक करण्यात आली.
यावेळी दि. (14) शुक्रावर रोजी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब साळुंके, संचालक कल्लेश्वर जाधव, सिंदफळे दिलीप यांच्या हस्ते कदम राजेंद्र, कोळी हणमंत, वाळके पुंडलिक, मोहनसिंग राजपूत आदींना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देवून सल्लागार या पदावर नेमणूक करण्यात आली.