लोहारा ( जि. धाराशिव ) / विशाल रोडगे
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर,शिवसेना ठाकरे गटाची तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, के. डी. पाटील, विजयकुमार ढगे यांसह
लोहारा पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब, इकबाल मुल्ला, बापू बंगले, प्रमोद बंगले, हरी लोखंडे, शब्बीर गवंडी, दीपक मुळे, बच्चन काळे, ढोकळे सर, श्रीरू भरारे, रोप बागवान, नाना पाटील, सलीम शेख हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वांनी संत संताजी महाराज यांच्या कार्याची, समाजप्रबोधनाच्या परंपरेची आणि मूल्यांची उजळणी केली. जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. भक्तांच्या मोठ्या सहभागामुळे परिसरात भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती यंदाही श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचे प्रतीक ठरली.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!