शिक्षकेत्तर संघटनेच्या अध्यक्षपदी शशिकांत जाधव यांची बिनविरोध निवड

पिंपरी : ( प्रतिनिधी )
माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळाचे राज्य सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहर शिक्षकेत्तर संघटनेचा मेळावा तसेच त्रैवार्षिक निवड प्रक्रिया शनिवारी बिनविरोध पार पडली. तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालयाचे लिपिक शशिकांत जाधव यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, मुख्याध्यापक संजय जाधव, सुनील भसे,कोषाध्यक्ष सुभाष तांबे, सुधीर बहिरट, राजेंद्र वाकोडे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना शिवाजी खांडेकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्त्यीस मान्यता, १०, २०, ३० वर्षाची आश्वासीत प्रगती योजना, आकृतिबंध, पदोन्नती मान्यता, वेतन पडताळणी इत्यादी समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहे, तसेच कामकाज करताना येणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यासाठी लिपिक मार्गदर्शन वर्ग घेणे तसेच मार्गदर्शकांची नेमणूक करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षकेत्तरांच्या कामाबाबतच्या समस्यांची सोडवणूक करणेसाठी संघटना सदैव प्रयत्नशील असून शिक्षकेतरांनी संघटित होणे गरजेचे आहे असे आवाहन शिवाजी खांडेकर यांनी केले.
मेळाव्यात संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विचारमंथन झाले. युडायस, शाला सिद्धी, स्टुडंट पोर्टल, एनपीएस पोर्टल, दहावी-बारावी ऑनलाईन आवेदन पत्र भरणे यासारख्या विविध वेब पोर्टल वर काम करताना येत असलेल्या समस्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मांडल्या.
यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन संजय कवितके यांनी केले.
—–
नूतन कार्यकारणी
अध्यक्ष- शशिकांत जाधव, उपाध्यक्ष-अतुल सोरटे, सचिव-पारस भटेवरा, कार्यकारिणी सदस्य-भगवंत चितळकर, मंजुश्री दुधेडिया, माधव डबीर, संतोष शिवले, भटु शिंदे