लोहारा येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

लोहारा : लोहारा तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कनिष्ठस्तर येथे न्यायाधीश एन.एस. सराफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतमध्ये दिवाणी प्रकरणे ४९ ,फौजदारी प्रकरणे २१ निकाली काढण्यात आली. फौजदारी प्रकरणामध्ये ६७०० रुपये दंड वसुल करण्यात आली. वादपूर्व प्रकरणामध्ये भारतीय स्टेट बँक लोहारा २१ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली,यामध्ये २१ लाख ३६ हजार ५४९ रुपयांची वसुल झाली. व महाराष्ट्र ग्रामीण बँक लोहारा २ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यामध्ये ३ लाख २४ हजार ८३८ रक्कम वसुल झाली. युनाइटेड बँक यामध्ये ३ प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये ३१ हजार रुपये वसुल झाली. लोहारा नगरपंचायत यांची कर वसुलीची ८ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली त्यामध्ये ६० हजार ४ रुपये वसुल झाली. ग्रामपंचायतचे एकूण २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
त्यामध्ये १५ लाख २१ हजार १६ रुपये इतकी कर वसुली करण्यात आली. सर्वे प्रकरणातील मिळून एकूण ४० लाख ८० हजार १०७ रुपये वसूल झाली. या राष्ट्रीय लोअदालत मध्ये सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. कळसकर, विधीज्ञ मंडळ लोहारा, या न्यायालयातील सर्व कर्मचारी, ग्रामीण भागातील पक्षकार, मोठया संख्येने हजर होते.