दोन मोटार सायकलचा अपघात होऊन तिघे जखमी

उमरगा : आज गुरुवारी ३ नोव्हेबर रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास उमरगा ते कोरेगाव वाडी जाणारी मोटार सायकल क्रमांक नाही व नंदगुर जाणारी मोटार सायकल क्रमांक नाही. या दोन मोटारसायकलचा उमरगा लातुर रोडवर अपघात झाला. यात विश्वनाथ गोविंद लवटे ( वय 26 ), महेश विठ्ठल कांबळे ( वय 32 ) दोघे रा. कोरेगाव वाडी, विनोद आकुंश बिराजदार ( वय 27 ) राहणार नंदगुर ता.आळंद सदर आपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र आपघात ग्रस्ताच्या सेवेत मोफत आसलेली जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उपजिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले आहे.