उमरगा- लोहारा : – जिथे काळोख होता, तिथे आता आशेचा उजेड आहे. पुण्यातील जी.के. फाउंडेशन आणि उमरग्याची ज्ञानज्योती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले गेलेले आरोग्य अभियान म्हणजे ग्रामीण भागातल्या सामान्य जनतेसाठी देवदूतासारखं ठरलं आहे.
या अभियानामागे उभे होते दोन झुंजार नेतृत्व – अधिवक्ता आकांक्षा चौगुले, अध्यक्षा, ज्ञानज्योती संस्था उमरगा आणि श्री. जगदीश खडके, उपाध्यक्ष, जी.के. फाउंडेशन, पुणे. त्यांच्या स्वप्नातून आणि सेवाभावातूनच हा सामाजिक क्रांतीचा अध्याय सुरू झाला.
हा आरोग्य उपक्रम जी. के. फाउंडेशन, पुणे व CSR पार्टनर फिडेस्टो प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १ जून ते १३ जुलै २०२५ दरम्यान राबवण्यात आला. उमरगा, लोहारा तालुक्यांतील विविध गावांमध्ये – येणेगुर, उमरगा पोलिस स्टेशन, भातागळी, जेवळी, माकणी, धानोरी, सास्तूर, हिप्परगा रवा, तावशीगड – येथे गावागावांत जाऊन शिबिरे आयोजित करण्यात आली.
या आरोग्य अभियानात एकूण २१७६ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० गरजू रुग्णांवर पुण्यातील नामवंत रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. उर्वरित २९८ रुग्णांवरही येत्या आठवड्यात पुण्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

मा.श्री. ज्ञानराज चौगुले ( माजी आमदार ) साहेब हे जनतेच्या नजरेत रुजलेलं नेतृत्व आहे. राजकारणाच्या व्यासपीठावरुन समाजसेवेच्या दिशा ठरवणारे ते एक सर्जनशील विचारवंत आहेत.
✨ “आरोग्य, शिक्षण व सक्षमीकरण हे ग्रामीण परिवर्तनाचे त्रिसूत्री आयुध आहेत – आणि ती शस्त्र जी आमच्या संस्थेकडे आहेत,” असे ते ठामपणे सांगतात.
ज्ञानज्योती संस्थेच्या स्थापनेपासून त्यांनी आरोग्यदायी ग्रामीण समाज घडवण्याचं स्वप्न पाहिलं, जे आज आकांक्षा ताईंच्या कार्यातून साकार होत आहे.ॲड. आकांक्षा चौगुले व श्री. जगदिश खडके यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समाजाविषयीची असोशी आणि अडचणीत असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी त्यांची तळमळ या साऱ्या गोष्टींचा परिपाक म्हणून आज या हजारो रुग्णांचे जीवन उजळून निघाले आहे.
ॲड. आकांक्षा चौगुले या समाजातील शेवटच्या माणसासाठी सातत्याने झटत असून त्यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानज्योती संस्था उमरग्यात वेगवेगळ्या आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरण प्रकल्प कार्यरत आहेत. “आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे, तो गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं त्या सांगतात.
या उपक्रमाने आरोग्य सेवा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. तीन सक्षम नेतृत्वांची त्रिसूत्री – ज्ञानराज सरांचे मार्गदर्शन, आकांक्षा ताईंची तळमळ, आणि जगदीश सरांचे नियोजन – यामुळे आज हजारो डोळ्यांत प्रकाश आणि मनात विश्वास निर्माण झाला आहे.
जनतेचा कौल:
“माझ्या आईच्या डोळ्यात ७ वर्षांनी प्रकाश परत आला – आकांक्षा ताईंनी जणू आईच्या जागी मायेचा हात दिला!” – भातागळी येथील लाभार्थी
“मोफत तपासणी, पुण्याला ने-आण, शस्त्रक्रिया आणि परत – सगळं विनामूल्य! हे स्वप्न वाटायचं!” – धानोरी येथील वृद्ध
Back to top button
error: Content is protected !!